Monday, September 16, 2013

पाऊस आणि मन...



मुसळधार पावसाचं थैमान काल रस्त्या-रस्त्यांत
तुझ्या आठवणींचं थैमान माझ्या मनाच्या कानाकोपऱ्यात

तुझ्या अवकाळी पाऊसभारानं रस्त्या-रस्त्यांवर ट्रॅफिक
माझ्या मनात फक्त तुझ्याच आठवणींचं ट्रॅफिक

छत्री न घेतलेला कित्येक जण पाऊसपाण्यानं चिंब चिंब भिजलेला
छत्री डोक्यावर असूनही तुझ्या दुराव्यानं मी ओलाचिंब झालेला

तू कोसळला नाहीस तर, कुठे गायब झालास म्हणून विचारणार
मी शांत बसलो तर, काय प्रेमभंग झाला की काय असं विचारणार

तू अचानक भरभक्कम कोसळलास, तर तुला वेडा समजणार
मी हसायला लागलो तर मला प्रेमात पड़लेला वेडा समजणार

तू आलास किंवा नाही आलास तरी तुझी थट्टा,
तू आली नाहीस म्हणून माझ्या आयुष्याला बट्टा,

तू आता दूरवर कोसळतो आहेस कुठे-कुठे
तुझ्या आठवणींत माझंही मन भटकतंय कुठे-कुठे...

No comments:

Post a Comment