(सौजन्य:- संतोष दरेकर)
--------------------------------------------------------------------------------------------
झंप्याला मान वर करुनच ती इमारत
पाहावी लागली. दोन बुरुज असणारी, एखाद्या गढीसारखी किंवा गडकोटासारखी असणारी ती भव्य इमारत.
झंप्यानं अशी इमारत एक तर ट्रेकिंगला गेल्यावर किल्ल्यांवर किंवा लहानपणी
दिवाळीच्या सुट्टीत मातीचा किल्ला बनवताना तयार केली होती. त्या इमारतीवर भगवाही
फडकत होता. झंप्याला एकदम छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण आली आणि मनातल्या मनात
त्यानं महाराजांना मानाचा मुजरा करत किल्ल्यासारख्या दिसणाऱ्या त्या इमारतीमध्ये
प्रवेश केला.
एवढ्या मोठ्या किल्ल्यासारख्या इमारतीत काहीतरी ऐतिहासिक असेल अशीच झंप्याची भ्रामक कल्पना. पण त्या भव्य दरवाजावर ‘अनिल क्लासेस’ अशी भव्य पाटी सुवर्णअक्षरांनी झळकत होती. त्यामुळे उत्सुकता आणखीनंच चाळवली होती. झंप्यानं आत पाऊल टाकलं. जागोजागी शिवाजी महाराजांच्या तसबिरी आणि पुतळे विराजमान होते. पण त्यातही विठ्ठलाला मानाचं आणि विशेष स्थान होतं. धिप्पाड आणि राकट वाटणारा कर्मचारी वर्ग, जणू सैनिकांसारखेच भासत होते.
उगाचच घुटमळणाऱ्या झंप्याला एकानं चांगलंच झापलं. ‘ ए! xxxx ’ उंडारायला आलास काय इथे?

झंप्याला आपलं स्वागत एवढ्या कमालीच्या
कोमल वाणीनं होईल अशी अपेक्षाच नव्हती.
‘नाही म्हटलं, तुमचा हा अनिल क्लासेस काय आहे याची चौकशी करायची होती’.
अनिल नाव ऐकल्यावर मात्र समोरच्याची बोबडीच वळली. त्यानं झंप्याचं एकदम जोरदार स्वागत केलं. बसायला खुर्ची दिली आणि सोबतच थंडगार शितपेयही मागवलं. एकंदरच अनिल नावाची मोठी दहशत होती तर...
‘नुकताच सुरु केला आहे आम्ही हा अनिल क्लास. तुम्हांला घ्यायचं आहे का अॅडमिशन?’.
‘पण क्लासचं नाव अनिलच का ठेवलं हो?’ झंप्याचा पुढचा प्रश्न.
‘काय आहे आमच्या मालकांच्या नावावरुन ठेवलं आहे. अलंकारिक भाषेत निर्लज्जपणे लज्जास्पद टीका कशी करायची. आता एवढा मोठा फुलफॉर्म लक्षात ठेवायचा म्हणजे वांदेच की! म्हणून अनिल क्लासेस असा शॉर्टफॉर्म केला आहे. राजकीय वर्तुळात सध्या प्रचंड चलती आहे. मोठं नाव कमावलं आहे आमच्या मालकांनी आणि क्लासेसनंसुद्धा. म्हणजे आता तर कदम-कदमवर आमच्या शाखा आहेत’. गर्व से कहो हम हिंदू है या चालीवर त्यानं हे वाक्य फेकलं.

हे सांगताना त्याच्या डोळ्यांत
अभिमान दाटून आला होता. हातातल्या रत्नजडित सोन्याच्या अंगठीचा मुका घेत त्यानं
डोळे मिटले आणि साक्षात त्याच्या डोळ्यांसमोर छोटे साहेबच अवतरले.
‘आमच्या छोट्या साहेबांची कृपा. छोट्या साहेबांनी आमच्या मालकांना पाठिशी घातलं. सुसंस्कृतपणाचं प्रशस्तीपत्रक दिलं. पुढे व्हा आणि तमाम माता-भगिणींना अभिमान वाटेल असं कार्य यापुढेही करत राहा असा प्रेमळ आशिर्वादही दिला होता. म्हणूनच अनिल क्लासेस काढण्याचं बळ मिळालं. त्या जाहीर समारंभात छोट्या साहेबांनी किती जणांना आपल्या शिंगावर घेतलं. पण आपल्या मालकांच्या पाठिशी छोटे साहेब ठामपणे उभे राहिले होते.’
छोट्या साहेबांच्या उपकारांच्या आठवणींनी अनिल क्लासेसच्या त्या सैनिकाला गहिवरुन आलं. हवेतल्या हवेत त्यानं पुन्हा हात जोडले. त्याचवेळेला अचानक समोरच्या विठ्ठलाच्या तसबिरीला चष्मा आणि पांढरी दाढी असल्याचा भास झाला. विठ्ठलाची नेहमीची लोभस मुद्रा कठोर झाली होती आणि डोळे तांबुसल्यासारखे उग्र झाले होते. त्या भासाने तो सैनिक मात्र चांगलाच चपापला. झंप्यासाठी ते नवलंच होतं.

‘अहो पण या क्लासेसमध्ये शिकवणार तरी काय? काय उपयोग आहे, ते तरी सांगा. तुमच्याच शेजारी ते नवनिर्माण क्लासेसही आहेत.’ नवनिर्माण नावं ऐकलं आणि त्या समोरच्या माणसानं झंप्यावर तुच्छतेचा एक कटाक्ष टाकला.
‘नवनिर्माणच्याही म्हणे कदम-कदमवर शाखा आहेत.’ झंप्यानं भोळसटपणाने म्हटलेल्या या वाक्यावर तो समोरचा माणूस पोट धरून हसत सुटला.
‘अहो कसलं आलंय नवनिर्माण? साधी टीका करतानाही त्यांच्याकडे नवीन कल्पना नाही. नवनिर्माणवाल्यांनी त्यादिवशी प्रतिस्पर्धी काटेकर क्लासेसवाल्यांना बांगड्यांच्या आहेर दिला आणि स्वत:च टीकेचे धनी बनले. पण एवढ्या बांगड्या पाठवल्याचा काटेकर क्लासेसना चांगलाच फायदा झाला. श्रावणात आपल्या युवती शाखांना काय द्यायचं हा प्रश्नच होता त्यांच्यासमोर, बांगड्या पाठवून नवनिर्माणवाल्यांच्या प्रश्न सुटला नाही, पण काटेकरांच्या युवती शाखेचा प्रश्न चुटकीसरशी सुटला’. छद्मीपणानं हसतं त्यानं सगळा वृत्तांत कथन केला.
‘त्यापेक्षा आमच्या मालकांचं बघा. समोरच्या व्यक्तीची चुटकीसरशी आणि तेही अलंकारीक भाषेतल्या कोमल वाणीत उतरवण्याची धमक आमच्या मालकांमध्ये आहे. आता काटेकरांचं नाव निघालं आहेच म्हणून सांगतो.’
‘ते काटेकर म्हणजे घड्याळवाले का हो?’ झंप्यानं आपली ‘लघु’शंका विचारली.
‘हो तेच ते’ समोरच्या माणसानं होकारार्थी मान हलवली.
‘अहो काय सांगू. काटेकर क्लासेसच्या धाकल्या मालकांनी शिवाम्बू हा अलंकारिक शब्द वापरायचा सोडून कोणता तो लाजिरवाणा शब्द उच्चारला आणि राज्यभर एकच गहजब झाला. त्यांच्या थोरल्या मालकांची मानही शरमेनं खाली गेली म्हणे’. पुन्हा त्या माणसाच्या चेहऱ्यावर छद्मी हसू होतं.
‘पण आमचे मालक, लय भारी. लिंगभेद न करता समोरच्याची उतरवात. म्हणूनच आमच्या छोट्या साहेबांनी काय कोडकौतूक केलं सांगू. अखिल कुटुंबवत्सल, सुसंस्कृत, वाचा पंडित अशा उपाध्याच देऊन त्यांना प्रशस्तीपत्रकही दिलं.’ पुन्हा एकदा त्यानं आपल्या मालकांबरोबरच छोट्या साहेबांनाही दंडवत घातला.
झंप्याला मात्र अखिलऐवजी कुटुंबवत्सल अनिल आणि वाचा पंडित ऐवजी वाचाळ असं काहीसं उगाचच ऐकल्यासारखं वाटलं. झंप्याची ती तंद्री मोडून काढत समोरच्या माणसानं आपली कॅसेट सुरुच ठेवली.
‘आमचे साहेब वस्त्रहरणकारही आहेत म्हटलं. जागच्या जागी वस्त्रहरण करण्यात एक्सपर्ट’
‘म्हणजे महाभारतातल्या भरसभेत द्रौपदीची वस्त्रं फेडणारा दु:शासनच म्हणायचा!’ झंप्याच्या भोळसटपणाचा म्हणजे कहरच होता. आपल्या मालकांना द्रौपदीची वस्त्रं फेडणारा दु:शासन म्हटल्याचं ऐकताच आजूबाजूच्या टेबलांवरच्या पाच-सहा मुठी आवळल्या गेल्या. मनगटं फुरफुरली. झंप्याला मात्र रत्नजडीत सोन्यानं मढवलेल्या अंगठ्यांनी भरलेल्या मुठी आणि मनगटावरच्या सोनसाखळ्या दिसत होत्या.
नवीन क्लासमध्ये आलेलं पहिलं गिऱ्हाईक आणि मतदानाच्या अगोदर सामान्य मतदार यांना नेहमीच राजासारखं वागवलं जातं. एकदा का क्लासमध्ये अॅडमिशन घेतलं किंवा मतदानानंतर निवडून आलं की क्लासमालक आणि राज्यकर्तेच खरे राजे होतात. गिऱ्हाईकाला आणि मतदाराला वाऱ्यावर सोडलं जातं. मग त्यांना दिलेली आश्वासनं खड्ड्यात गेली तरी काहीच फरक पडत नाही. एवढं समजायला झंप्या तेवढा हुशार होता. त्यामुळे त्या समोरच्या माणसानं त्या उठलेल्या मुठींना शांत केलं.
‘बघा आमच्या मालकांना दु:शासन म्हटल्यावर आमच्या स्टाफच्या सहनशक्तीचा कसा अंत झाला. तसंच समोरच्याचं वस्त्रहरणं करायचं असेल तर तुमच्याही सहनशक्तीचा अंत झाला आहे असं तुम्हांला प्रकर्षानं वाटलं पाहिजे. तुम्ही अजिबात संयमी असता कामा नये. एकदा का तुमची सहनशक्ती संपली की भाषेचा वापर करताना कोणाचीही चाड किंवा मर्यादा बाळगण्याचीही गरज नाही. समोर स्त्री असो किंवा पुरुष. वस्त्रहरणाच्या बाबतीत सगळे एकाच पातळीत. मग बघाना, साधं एखाद्या सुरक्षारक्षकानं जरी तुमचं ओळखपत्र मागितलं तरी तुमच्या सहनशक्तीचा अंत व्हायला हवा.’
झंप्या मात्र सहनशक्तीचा
अंत यावर विचार करत होता. गेल्या कित्येक वर्षात झंप्यासारख्या सामान्य मराठी
मतदारांनी ओळीनं मुंबई महापालिकेवर भगवा फडकवला होता. पण सोयीसुविधांच्या बाबतीत
मुंबईकरांची झोळी फाटकीच होती. ठिगळ मारलेली.
खड्ड्यांची चाळण झालेल्या रस्त्यांतून प्रवास करताना जीव मेटाकुटीला आला होता. स्लीप डिस्कसारख्या व्याधी वाढल्या होत्या. कंबरदुखी, पाठदुखी तर नित्याचीच होती. खड्ड्यांत पडून सामान्य मतदारांना आपले प्राणही गमवावे लागले होते. पावसानं जोरदार हजेरी लावली की आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मिरवणाऱ्या मुंबईची वाहतूक ठप्प होत होती. गटारांच्या घाण पाण्यातून कशीबशी वाट काढावी लागत होती. फुटपाथवरच्या अतिक्रमणांनी तर रस्त्यानं नीट चालायचीही सोय राहिली नव्हती. महापालिका रुग्णालयांत रुग्णांची अवस्था बिकट होती. झोपडपट्टीवासियांनी मोफत घरं या ऐतिहासिक घोषणेनंतर तर मुंबईत झोपडपट्ट्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती.
मुलभूत यंत्रणा आणि सुविधांवर त्यामुळे प्रचंड त्राण पडला होता. एकीकडे झोपडपट्टीवासियांना फुकट घरं देताना दुसरीकडे मराठी माणसांच्या जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मात्र सुटला नव्हता. ज्या मराठी मतदारांनी भरभरुन मतं देत महापालिकेवर भगवा फडकवला तोच मराठी माणूस मुंबईबाहेर फेकला जात होता. ‘करुन दाखवलं’च्या नावाखाली फसवणूक झाली होती. पण एवढं होऊनही मुंबईकरांच्या सहनशक्तीचा मात्र कधीच उद्रेक झाला नव्हता. पण फक्त सुरक्षारक्षकानं ओळखपत्र विचारलं तर सहनशक्तीचा अंत कसा होतो हे मात्र झंप्याच्या कल्पनेपलिकडचं होतं. आता खरं तर झंप्याच्या सहनशक्तीचा अंत झाला होता.
समोरच्या भिंतीवरचा विठ्ठल मात्र कटेवर हात घेऊनच उभा होता. आता मी काहीच करु शकत नाही असंच बहुदा त्याला सांगायचं होतं. त्यामुळे विठ्ठलाकडे गाऱ्हाणं घालण्यात काहीच अर्थ नव्हता. अनिल क्लासेसचा माणूस झंप्याला काहीतरी सांगत होता. पण झंप्या तडक उठला. बस स्टॉपवर आला. बेस्टची बस पकडण्याचा प्रयत्न केला, पण बेस्टच्या बसचालकांच्या अंगात मुजोरी भिनलेली. कशीतरी धावतपळत त्यानं बस पकडली.

मास्तरांनी विचारलं तेव्हा झंप्या तावातावानं म्हणाला, ‘एक कलानगर!’….