पावसाच्या आगमनानं साऱ्या सृष्टीत चैतन्य
बहरतं. बाहेरचं आल्हाददायक वातावरण सुखावणारं असतं. अशा वेळेला भटकंती करण्याची
मौज काही औरच. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्या, डोंगररांगा पायाखाली घालणाऱ्या भटक्या मंडळींचा म्हणजेच
ट्रेकर्सचा तर हा सुगीचा काळ. पावसाळ्यात ट्रेक करण्याचा मोह पक्क्या ट्रेकर्सना
तरी कधीच आवरता येत नाही. माझंही तसंच झालं. कित्येक दिवसांपासून ट्रेक खुणावत
होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या
रगाड्यातून सुट्टी मिळाली ती सोमवारी. आता सोमवारी ट्रेक करायचा तर सवंगडी
मिळण्याची शक्यताच कमी. ट्रेकिंगमधला त्यातही माझा भरवशाचा साथीदार म्हणजे संदीप
लाड.. गेली सात आठ वर्ष आम्ही सह्याद्रीच्या रांगांमधली गुंजवणं, मावळ, कानंदखोरी
पालथी घातली. अनेक डोंगरवाटा तुडवल्या. भाभा अणुसंशोधन केंद्रात (BARC) कार्यरत असताना शनिवार, रविवारी
सुट्टी असल्याचा पुरेपूर फायदा उठवला. पण काळ बदलला. माझं क्षेत्र बदललं. मग
कालांतरानं ट्रेकिंगही कमीच झालं.
त्यामुळं मग सोमवारी जायचं तर ठरलं, मग काय आमच्याच क्षेत्राचा कोणतातरी सवंगडी हवा. अखेरीच माझाचा दिपक पळसुले हा दुर्गवेडा एका पायावर तयार झाला. बेत ठरला. कुच करायची ती मुंबईजवळच्याच पेबवर... पेब हा तसा इतिहासासाठी प्रसिद्ध किल्ला नव्हे. धान्याचं कोठार म्हणून त्याचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. पण हा किल्ला म्हणजे भल्या भल्या ट्रेकर्सनाही आपली वाट चुकवायला लावणारा.. म्हणूनच त्याचं दुसरं नाव म्हणजे विकटगड.. ठरलं मग हाच किल्ला सर करायचा.
नेरळ स्टेशनहून रिक्षा करून कातकरवाडीत पोहोचलो. नवीन साथीदार त्यामुळे पहिला नियम मोडला. एरव्ही पायवाट तुडवत ट्रेकिंग करण्याचा माझा शिरस्ता. अनेक नियम मीच तयार केले आणि संदीप आणि मी नेहमीच ते काटेकोरपणे पाळले. कातकरवाडीतून पेबच्या दिशेनं वाटचाल सुरु झाली. पाऊस धो धो बरसायला लागला होता. समोरचा पेबचा किल्ला कधीच धुक्याच्या चादरीत लपून गेला.. त्याखालचा नयनरम्य धबधबा मात्र सारखं लक्ष आकर्षित करत होता. याच नादात पहिलीच वाट चुकली. दिपकनं धबधब्याच्या दिशेनं कुच केलं. ओढ्याच्या मार्गानं जाऊ असा त्याचा कयास. इथं मी माझा दुसरा नियम मोडला. ट्रेकिंगचा महत्वाचा नियमच हा की पायवाट कधीच सोडू नका. त्यात धबधबा किंवा ओढ्याची वाट तर कधीच धरू नये. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्यानं कुठं काही विपरीत घडेल याची शाश्वती नसते. पण वाट तर धरली होती.

ओढ्यातून
मार्गक्रमण करताना मात्र मज्जा आली. प्रवाहातून वाट काढत काढत, त्यातच
फोटोग्राफी करत मनसोक्त आनंद लुटत होतो.

पण नंतर मात्र नियम मोडल्याचा प्रत्यय आलाच. अशा ठिकाणी येऊन पोहोचलो. समोर धबधबा आणि त्याच्या दोन्ही बाजूंनी कातळकडा. मनाशी निर्धार केला, उजव्या दिशेचा कातळकडा सर करुन पठारावर पोहोचायचं. लक्ष्य कठीण होतं. पावसामुळे दगडांवर शेवाळ उगवलेलं. माती आणि दगड सैल झालेले. त्यात पाठीवर सॅकचं ओझं. मनाशी खुणगाठ बांधली आणि पालीसारखे कातळकड्याला चिकटलो. हळुहळु चढाई पुढं पुढं सरकली. मध्यापर्यंत कडा सर केला. पण एका ठिकाणी मात्र मीच अडकलो. धड पुढं जाता येईना, ना मागं वळता येईना. दिपक मात्र माझ्या बाजूनं पुढं सरकला. मी मात्र चक्क दहा मिनिटं पालीसारखाच चिकटून होतो. अखेरीस कसंबसं दोन पावलं खाली उतरलो.
मोठ्या मुश्किलीनं दोघंही पठारावर पोहोचलो. पण तोपर्यंत खुपच दमछाक झाली. मग मात्र पुन्हा पायवाटेनं जायचं ठरलं.
पायवाट तुडवत आमची दरमजल सुरु होती. वा़टेत एक स्थानिक जोडपं भेटलं. त्यानीही आम्ही योग्य वाटेवर असल्याची ग्वाही दिली. मग पुन्हा पुढे सरकलो. पण पुन्हा एकदा वाटांची सरमिसळ झाली. चार वाटांमधली नेमकी पेबकडे जाणारी वाट कोणती हेच कळेना. पेबचा किल्ला तर धुक्यामुळे दिसतच नव्हता. पण त्यातलीच एक वाट निवडली. पण ही वाट चुकल्याचं अर्धा तासांची पायपीट केल्यावर समजलं. एव्हाना दम निघाला होता. त्यात खायलाही काही घेतलेलं नव्हतं. माझ्याकडचा न्यूट्रिशन शेक होता. तो मग मी आणि दिपकनं शेअर केला. दिपकचं म्हणणं होतं याच वाटेनं पुढं सरकुया. पण मी मात्र त्याला ठाम नकार दिला. दुपारचे तीन वाजून गेलेले. पुन्हा परतायचे वांदे व्हायचे.
आल्या वाटेनं पुन्हा माघारी परतलो. मनाशी निर्धार करुन की ज्या वाटेनं चकवलं ती वाट पुन्हा शोधून पेब सर करायचाच... आठ वर्षांच्या ट्रेकिंगमध्ये पहिल्यांदाच मोहिम अयशस्वी ठरली. त्याला कारणही मीच होतो. ट्रेकिंगचे मुळातले नियमच पायदळी तुडवले.

No comments:
Post a Comment